श्री छत्रपती शिवाजी गुरूजी माध्यमिक विद्यालय
उजनी (मा.), ता. माढा, जि. सोलापूर
UDISE - 27300410003
👩🏫 कर्मचारी माहिती
| अ. क्र. | नाव | पदनाम | मोबाइल नंबर |
|---|---|---|---|
| 1 | श्री. बालाजी संदीपान काकडे | मुख्याध्यापक | 8390098000 |
| 2 | श्री. विठ्ठल पितांबर चोपडे | सहशिक्षक | 9561903555 |
| 3 | श्री. तानाजी भुजंगराव काकडे | सहशिक्षक | 9823932843 |
| 4 | श्री. प्रकाश पांडुरंग सानकरे | सहशिक्षक | 9595667796 |
| 5 | श्रीमती. शीतल अरविंद गायकवाड | सहशिक्षिका | 8308331254 |
| 6 | श्री. नवनाथ अभिमान पिसे | लिपिक | 8788027289 |
| 7 | श्री. जयराम राजाराम घाडगे | शिपाई | 8010403497 |
१) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात प्रशालेने सहभाग नोंदविला असून या उपक्रमात प्रशालेने माढा तालुक्यामध्ये तिसरा क्रमांकासह प्रशालेला २ लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीसाचा रकमेचा उपयोग शाळेच्या भौतिक सुविधांसाठी करण्यात येणार आहे.
२) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) या परीक्षेसाठी प्रशालेच्या इ. ८ वीच्या वर्गातील ११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले.
३) शालेय क्रीडा स्पर्धा
-
सन २०२२-२३ या वर्षी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आदर्श विद्यालय कुर्डुवाडी या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रशालेने १४ वर्ष वयोगट मुलींच्या संघाने तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला व भोसरी पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धा खेळण्याचा बहुमान मिळविला. व या स्पर्धेत प्रशालेच्या १४ वर्षवयोगटातील मुलींनी विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला.
-
सन २०२३-२४ शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा प्रगती विद्यालय कुर्डुवाडी येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रशालेने १७ वर्ष वयोगट मुलींचा संघाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. व जिल्हास्तरावर खेळण्याचा बहुमान मिळविला.
३) तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा
माढा येथे झालेल्या 1600 मीटर धावणे स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. सानिका बंडु सुर्यवंशी हिने तालुका स्तरावर तृतीय क्रमांक मिळविला.
४) शालेय क्रीडा स्पर्धा (सन २०२५-२६)
लढेवाडी ता. माढा येथे झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी १७ वर्षांखालील मुलींचा संघ पात्र झाला आहे.
५) वक्तृत्व स्पर्धा
कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जयंती निमित्त ५ ऑक्टोबर रोजी गौडगाव ता. माढा येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आमच्या विद्यालयातील प्रशांत लढेवाडी, प्रीती संतोष बडे यांनी सहभाग मिळविला. कु. सानिका बंडु सुर्यवंशी हिने तालुका स्तरावर विजेतेपद मिळविले. तसेच रोहित जागवे, कु. सानिका बडे सुर्यवंशी व दामिनी उज्ज्वल यांनी सहभाग मिळविला.
६) लोकसहभाग
विद्यालयाचे नवीन इमारत शाळा वर्ग खोल्या बांधकाम करण्यासाठी उजनी (मा) गावातील ग्रामस्थ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व संस्था यांच्या सहकार्यांतून विद्यालयाच्या तीन नवीन वर्ग खोल्या बांधकाम करण्यासाठी जवळपास २५ लाखांचे लोकवर्गणी जमा करण्यात आली.
